एकनाथ शिंदेंनी वाढवली उद्धव ठाकरेंची डोकेदुखी
निवडणूक आयोगाच्या: माध्यामातून ठाकरे गटावर शिंदेची 'अशी' कुरघोडी
मुंबई दि २४(प्रतिनिधी)-उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंची डोकेदुखी वाढवली आहे. शिंदे गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तब्बल दीड लाख प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात आली आहेत.शिंदे गटाच्या वतीने शिवसेना पक्षावर दावा करण्यात आला आहे. त्यासाठी आयोगाने शपथपत्र जमा करण्यास सांगितले आहे.त्यात ठाकरेंवर शिंदेनी कुरघोडी केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसार कागदपत्रे देखील शिंदे गटाने जमा केली आहेत.ठाकरे गटाने मात्र कागदपत्रे देण्यासाठी वाढीव ४ आठवड्यांचा वेळ मागितला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण आता घटनापीठाकडे सोपावण्यात आलं आहे.त्यावर २५ तारखेला म्हणजेच गुरूवारी सुनावणी होणार आहे पण शिवसेनेने किती प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत याची माहिती मिळू शकली नाही.25 ऑगस्टला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सर्व प्रकरणांची सुनावणी होणार आहे. तसंच, जोपर्यंत सुनावणी सुरू आहे, तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे गुरुवारचा दिवस देखील ठाकरे गटासाठी महत्वाचा ठरणार आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्रं देण्यात आल्यानंतर या सगळ्याची छाननी निवडणूक आयोगाकडून होईल. ही छाननी झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वेळ जास्त जाणार असल्यामुळे मधात निवडणूका आल्यास चिन्ह गोठवल जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकर निर्णय व्हावा असा प्रयत्न दोन्ही बाजूनी केला जाणार आहे.