Latest Marathi News
Ganesh J GIF

दिडशे काॅल करूनही पत्नीचे उत्तर नाही, पतीचे धक्कादायक कृत्य

अकरा दिवसापुर्वीच आई बनलेल्या पत्नीसोबत पोलीस पतीचे संतापजनक कृत्य, पहा प्रतिभा सोबत नेमके काय घडले?

बेंगलोर दि ८(प्रतिनिधी)- पती पत्नीच्या नात्यात विश्वास फार महत्वाचा असतो. पण नात्यात जर संशयाचे भुत शिरले तर संसार टिकत नाही. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. कर्नाटकात पतीने केवळ संशयातून पत्नीचा खून केला आहे.

प्रतिभा असे हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. तर किशोर डी. असे आरोपी पतीचे नाव आहे. कर्नाटकातील होसकोटेजवळ कलाथूर गावात सोमवारी सकाळी ही भीषण घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल किशोर डी. हा चामराजनगरच्या रामसमुद्रमध्ये पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याची पत्नी प्रतिभा गर्भवती असल्याने आपल्या माहेरी गेली होती. जिथे ११ दिवसांपूर्वीच तिने एका मुलीला जन्म दिला. त्यावेळी नवजात मुलीला पाहण्यासाठी किशोर उत्सुक होता. पण किशोर सतत आपल्या पत्नीवर संशय घेत असल्याने तिने पतीशी बोलणे थांबवले होते. घटनेच्या आदल्या दिवशी किशोरने आपल्या पत्नीला तब्बल १५० वेळा काॅल केला पण पत्नीने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे किशोरचा संताप अनावर झाला. यानंतर किशोर २३० किलोमीटर प्रवास करत पत्नीच्या माहेरी पोहचला. यावेळी त्याने प्रथम स्वतः कीटकनाशक प्राशन केले आणि नंतर पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने प्रतिभाच्या गळ्याभोवती फास घातला. ही हत्या नसून आत्महत्या आहे हे दाखवण्याचा बनाव केला. पण अखेर हा बनाव समोर आला आहे. पोलिसांनी प्रतिभाचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला होता. त्यामुळे ती आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले. पण आता किशोर गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आहेत. तिथून डिस्चार्ज मिळाल्यावर पोलीस त्याला अटक करणार आहेत. पीडितेचे वडिल सुब्रमण्यन यांनी आरोपी किशोरला जन्मठेप देण्याची मागणी केली आहे. किशोरची आई हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

मागील वर्षी प्रतिभा आणि किशोरचं लग्न झालं होते. परंतु लग्नाच्या काही दिवसांत त्यांच्यात भांडणे होऊ लागली. किशोरला नेहमी पत्नी प्रतिभाच्या चारित्र्यावर संशय होता. तो प्रतिभाला आरोप लावायचा. तिचा छळ करायचा. वैवाहिक कारणामुळे प्रतिभाच्या घरच्यांनी अनेकदा किशोरला समजावले होते. पण तरीही किशोरच्या वागण्यात बदल झाला नाही. आता आरोपी किशोरला अटक केल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!