Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्याच्या बीटी कवडे रोड गोळीबार करत सराफाला लुटले

गोळीबारात व्यापारी जखमी, परिसरात भीतीचे वातावरण, कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, पोलीसांसमोर आव्हान

दि ९ (प्रतिनिधी)- विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यात दिवाळी सण जवळ आल्याने बाजारपेठेत चलती आहे. पण याच धामधुमीत एक धक्कादायक घटना घडली आहेत. पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

शहरातील वानवडी भागातील बी. टी. कवडे रोडवर ही गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत गोळ्या झाडण्यात आलेला सराफ व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. प्रतिक मदनलाल ओसवाल असे गोळीबारात गंभीर झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रतिक ओसवाल आणि त्याचे वडील दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी  क्रोम मॉल चौकापासू बी. टी. कवडे रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी प्रतिक ओसवाल यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. यावेळी प्रतिकच्या तोंडाला आणि मांडीत गोळी लागली आहे. यामध्ये प्रतीक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रतिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिक आणि त्याचे वडील सोने घेऊन निघाले होते. गोळीबार करणाऱ्यांनी ते सोने घेऊन गेल्याचे प्रथमदर्शी नागरिकांनी सांगितले आहे. चोरटे त्यांच्याकडे असलेले सोने हे घेऊन फरार झाले आहेत. अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. ऐन दिवाळीच्या सणावर भर रस्त्यात गोळीबारचा प्रकार घडल्यामुळे परिसरात मोठं भीतीचे वातावरण पसरलं आहे.

पुण्यात गुन्हेगारीच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. क्षुल्लक कारणावरुन हत्येच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. कोयता गँगचा धुडगूस पुण्यात सुरूच आहे. तर हत्येच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. घरात घुसून हत्या होत असल्यामुळे पुणे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!