Latest Marathi News
Ganesh J GIF

स्फोटानंतरही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे पडला नाहीच

पोकलेन मशीनद्वारे पाडण्यात आला पूल, अधिकारी म्हणतात...

पुणे दि २(प्रतिनिधी)- पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल स्फोटकांद्वारे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र स्फोटांमुळे हा पूल पूर्णपणे खाली कोसळला नसून तो खिळखिळा झाला . त्यानंतर पोकलेन मशीनद्वारे पूलाचे भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, या स्फोटांमुळे पूर्णपणे पूल खाली कोसळलेला नाही. ज्या पद्धतीने दिल्लीतील ट्विन्स टाॅवर पाडण्यात आले होते तसे यश पुण्यात प्राप्त करता आलेले नाही.

चांदणी चौकातील पूल पाडण्याआधीच प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती. पूल परिसरातील २०० मीटर परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता.रात्री ११ नंतर वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला. पुलाच्या दोन्ही बाजूने भल्या मोठ्या पांढर्‍या पडद्याने झाकण्यात आले होते. रात्री १ वाजता स्फोट झाला आणि अगदी काही सेकंदात पुलाचा मध्यभाग खाली आला. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला. त्यामुळे पूल सहा सेकंदात जमीनदोस्त होणार हा दावा फोल ठरला. पूल न पडल्याने अखेर पोकलेनच्या मदतीने दोन्ही बाजूने पूल पाडण्यात आला. १ हजार ३५० डिटोनेटरच्या स्फोटानंतरही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे का पडला नाही हे सांगताना अधिकाऱ्यांनी म्हणाले, “हा पूल बांधण्यात आला त्यावेळी मोठ्या प्रमाणावर स्टीलचा वापर केला गेला. आम्हाला त्या स्टीलचा अंदाज आला नाही. त्यामुळे स्फोटानंतर पुलाचा काही भाग शिल्लक राहिला.” पुल न पडल्याने पोकलेनची मदत घ्यावी लागली.

नियोजनाप्रमाणे पूल न पडल्याने पोकलेनच्या मदतीने पूल पाडण्यात आला. त्यात वेळ गेल्याने  सकाळी ८ वाजता वाहतूक पूर्ववत करण्याचे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे नियोजनही कोलमडले. यामुळे सकाळी दोन्ही बाजूने तब्बल १० किलोमीटरपर्यंत जड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.मात्र, १० नंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!