Latest Marathi News

मोबाईल चार्जरने पती पत्नीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट

पतीचा दावा एैकुन पोलिसही हैराण, बघा नेमक काय घडल

जळगाव दि २(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. संशयाच्या कारणातून निमखेडी शिवारातील ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमध्ये पती जितेंद्र पाटील याने आपली पत्नी कविताचा मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. थक्क करणारी गोष्ट म्हणजे पत्नीचा खून करून पती जितेंद्र स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यामुळे पोलिसही आवक झाले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र आणि कविताचा साधारण तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. ते मूळ धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवाशी आहेत.लग्नाचा काही काळ आनंदात गेल्यानंतर जितेंद्रला कविताच्या वर्तणुकीबाबत संशय आला. त्यावरुन दोघात सतत वाद होत होता. गावात बदनामी नको म्हणून दोघेही जळगाव शहरातील आहुजानगर परिसरातील शिवधाम मंदिराजवळ ब्रह्मांडनायक अपार्टमेंट राहण्यासाठी आले. मात्र, पत्नीच्या वागणुकीत बदल झाला नाही. पुढे जाऊन कविता आत्महत्या करून जितेंद्रला फसवून टाकण्याची धमकी देत होती. घटनेच्या दिवशीही तसाच वाद दोघांमध्ये झाला त्यावेळी कविताने जितेंद्रला आत्महत्या करण्याची धमकी दिली.त्यातून वाद वाढला आणि संतापून जितेंद्रने मोबाईल चार्जरच्या वायरने गळफास देत कविताची हत्या केली. गळफास दिल्यावर कविताचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर जितेंद्र हा स्वतःच तालुका पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानेच पोलिसांना मी पत्नीचा वायरने गळा आवळून खून केल्याची माहिती दिली.

जितेंद्र आणि कविता यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांनी सुरवातीला आनंदात संसार केला.पण संशयाच्या कारणावरून दोघात सतत वाद होत गेला. त्यातुन ही हत्या झाली. त्यांना एक दीड वर्षाची मुलगी देखील आहे. आईची हत्या झाली आणि बाप जेलमध्ये गेल्याने कवळ्या वयातच ती अनाथ झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!