Latest Marathi News
Ganesh J GIF

‘हिजाब घातला तरी प्रोब्लेम, बिकिनी घातली तरी प्रोब्लेम’

बिकीनी वादावर या खासदार अभिनेत्रीचा भाजपाला टोला

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- पठाण चित्रपटातील ‘बेशरम’ गाण्यावरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. दीपिका पदुकोणला भगव्या रंगाची बिकीनी घालून चित्रपट निर्मात्यांनी हिंदू धर्माचा अपमान केला आहे. असा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. आता या वादात टीएमसी खासदार आणि चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ हिने उडी घेतली आहे. नुसरत जहाँने भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

नुसरत जहाँने सांगितले की, “या लोकांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे. सत्तेत बसलेला पक्ष लोकांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये नवे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर एखाद्या स्त्रीने हिजाब घातला तरी यांना प्रोब्लेम आहे. जर एखाद्या महिलेने बिकिनी घातली तरी या लोकांना त्रास होतो. खरं तर या लोकांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे. हेच लोक नव्या पिढीच्या महिलांना काय घालायचे हे सांगत आहेत.हे लोक आमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण काय घालावं, काय खावं, कसं बोलावं, कसं चालावं, शाळेत काय शिकावं आणि टीव्हीवर काय बघावं… सगळं हे लोक ठरवत असतात. या तथाकथित नवविकसित भारतात आपल्याला त्यांच्या पद्धतीने वागवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे सर्व खूप भीतीदायक आहे. मला भीती वाटते की, हे सर्व जास्त दिवस चालले तर आपण कुठे पोहोचू हे माहित नाही.’असे म्हणत दिपीकाचे समर्थन केले आहे. त्यामुळे आता हा वाद राजकीय रंग घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. १२ डिसेंबर रोजी ‘बेशरम रंग’ हे या चित्रपटातलं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं. चाहत्यांना हे गाणं आवडलं आहे; मात्र या गाण्यातल्या वेशभूषेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!