Latest Marathi News
Ganesh J GIF

भाडेकरुच्या बायकोसोबत घरमालकाचे अनैतिक संबंध

जळगावात घरमालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, बघा काय घडलं

जळगाव दि १७ (प्रतिनिधी)- भाड्याने राहत असलेल्या विवाहितेसोबत अनैतिक संबंध ठेवल्यामुळे घरमालकाचा धारदार हत्यार आणि दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात घडली आहे. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी असे मृत तरूणाचे नाव आहे. भाड्याने घरात राहणाऱ्या विवाहितेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीसांनी या हत्येप्रकरणी सत्यराज गायकवाड, सुनिल तडवी,या दोन तरूणांना अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद शेट्टी हा नेहमीप्रमाणे ड्युटी आटोपून घरी येण्यासाठी निघाला. पण दोन दिवस उलटूनही तो घरी परतला नाही. याच दरम्यान पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याचा मृतदेह सोमवारी गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ आढळून आला. एमआयडीसी पोलिसांनी खून करणाऱ्या संशयिताबद्दल माहिती काढली असता आरोपी जंगलात लपून बसल्याचं समोर आलं. दोघेही आरोपी जळगाव तालुक्यातील उमाळा येथील जंगलात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खून करणाऱ्या सत्यराज नितीन गायकवाड, सुनिल लियामतखाँ तडवी,या दोघांना अटक केली आहे.

पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कट रचून दोघांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या हत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!