
कोल्हापूर दि २० (प्रतिनिधी)- महाडिक गटाचे सलग पराभव झाले. विरोधकांनी कुटनीतीने खोट्या केसेस दाखल करून महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला.पण येथून पुढे जिल्ह्याच्या राजकारणात महाभारतच होणार, असा इशारा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी बंटी पाटील यांना दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या आखाड्यात पुन्हा एकदा मुन्ना विरूद्ध बंटी असा सामना होण्याची शक्यता आहे.
धनंजय महाडिक राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा फार्मात आले आहेत ते एका कार्यक्रमात विरोधकांना इशारा देताना म्हणाले की, आमचं ठरलंय` म्हणत लोकसभा निवडणुकीत माझा घात केला. गेल्या अडीच वर्षात प्रचंड त्रास दिला. आमच्यावर केसेस टाकल्या. अभिमन्यूला चक्रव्युहात घेरल्यासारखं मला घेरलं होतं. पण मी तेंव्हा बोललो होतो, सत्ता आमच्याकडे आली तर तुम्हाला झेपणार नाही. इथून पुढे महाभारत होणार. आज आमचे दिवस आले आहेत. यापुढे वाईटांचे वाईटच होईल, असा इशारा महाडिक यांनी पाटील गटाला दिला आहे.यावेळी चुळबुळ करणाऱ्यांना माझा इशारा आहे. येथून पुढील सर्व निवडणुकीत हिशोब चुकता केला जाईल. अस म्हणत निवडणुकीला सज्ज असल्याचे सूचक विधानही त्यांनी केल आहे.
कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक म्हणजेच मुन्ना विरुद्ध बंडी असा दोन गटात नेहमी सामना होत असतो. मागील दोन तीन वर्षापासून महाडिक गटाला सतत पराभवाला सामोरे जावे लागत होते.पण राज्यसभा निवडणूकीनंतर राज्यात भाजपाचे सरकार आल्याने महाडिक गटाची ताकत वाढली आहे. त्यामुळेच महाडिक यांनी पाटलांना खुल आव्हान दिल आहे.