Just another WordPress site

‘बंगले वाटपात ही फडणवीसांचीच बाजी’

पहा कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला मिळाला

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ज्या वेगाने महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती दिली त्याच्या उलट वेळ त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला आणि खातेवाटपाला लावला आहे. त्याचबरोबर आज मंत्र्यांना बंगल्याचेही वाटप करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळातील मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप केले आहे. यावेळेस नाराजी टाळण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या पसंतीनुसार बंगले मिळाले आहेत. अधिवेशन कालावधी संपताच मंत्री त्यांना मिळालेल्या निवासस्थानी रहायला जातील.पाहूयात कोणाला कोणता बंगला मिळाला आहे.

 

नाव आणि बंगला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-
वर्षा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर-
रॉयल स्टोन

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन- सेवासदन

GIF Advt

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार- पर्णकुटी

शिक्षणमंत्री दीपक केसरकर- शिवनेरी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-
सागर आणि मेघदूत

विरोधी पक्षनेते अजित पवार- देवगिरी

कामगारमंत्री सुरेश खाडे-
देवगिरी

 

देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे मंत्रिमंडळात महत्वाची खाती मिळवली आहेत. त्याप्रमाणे त्यांनी दोन बंगले मिळवत आपलीच कमांड असेल हे दाखवून दिल आहे. अन्य मंत्र्यांनाही लवकरच घरे मिळतील. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी काही घरांचे सुशोभीकरण केले होते, त्या घरांना पसंती दिली जाण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!