Just another WordPress site

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी तयार

खातेवाटपाप्रमाणे यादीतही शिंदे गटाच्या हाती भोपळाच?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.आणि शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली राज्यपालनियुक्त आमदारांची यादी रद्द करण्यात येणार असून, नव्या शिंदे-फडणवीस सरकारने नवी यादी तयार केल्याची माहिती समोर आली आहे

GIF Advt

राज्यपाल नियुक्त यादीत शिंदे गटाला १२ पैकी अवघ्या तीन जागा मिळणार असून नऊ जागा भाजपला मिळणार असल्याचे भाजपाच वरचढ ठरणार आहे.शिंदे गटाकडे ४० आमदार असल्याने त्यांना मंत्रिमंडळात १८ मंत्रीपदे मिळाणार आहेत यातील दोन ते तीन पदे ही अपक्षांना देण्यात येणार आहेत. सध्या शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सहानभूती उद्धव ठाकरे यांना भेटत आहे.त्यामुळे जनाधार वाढवण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी राज्यपालनियुक्त विधान परिषद सदस्यांच्या यादीत अधिक जागा मिळाव्यात, असा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.त्यामुळे मंत्रिपदे आणि राज्यपालनियुक्त आमदार यांची संख्या वाढवून मिळावी, यासाठी एकनाथ शिंदे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करणार आहेत.दुसरीकडे विधानसभेनंतर विधानपरिषदेतही आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी सभापतीपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.विधान परिषदेच्या सभापतीसाठी भाजपकडून प्राध्यापक राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपचा सभापती व्हावा यासाठी सभापती निवडीपूर्वी राज्यपाल कोट्यातील १२ आमदार नियुक्त व्हावे यासाठी भाजपचा प्रयत्न सुरु आहे.

मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवत भाजपने सरकारमधील आपले वर्चस्व आधीच सिद्ध केलं आहे. पण राज्यपाल नियुक्त आमदारही कमीच वाट्याला आले तर एकनाथ शिंदे गट आणखी बॅकफूटवर जाणार आहेत.त्यामुळे प्रत्येकाची मनधरणी करताना शिंदेंची दमछाक होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!