Latest Marathi News
Ganesh J GIF

जिकडे बघाल तिकडे कांदाच कांदा.. कोणते आहे हे मार्केट ?

कसा आहे कांदा बाजारभाव ? बार्शी तालुक्यातून मोठी आवक

सोलापूर प्रतिनिधी –  कृषी बाजार समितीच्या कांदा मार्केटमधील नियोजन कोलमडले आहे. सोमवारी आवक वाढल्याने मंगळवारी लिलाव बंद ठेवला. पुन्हा बुधवारी १००० पेक्षा जास्त ट्रक कांद्याची आवक झाली. आता गुरुवारीही लिलाव बंद राहणार आहे. पुन्हा शुक्रवारी हिच परिस्थिती उद्भवणार आहे. चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लिलाव बंद न ठेवता नियोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढत आहे. मागील महिन्यात पाच हजारांपेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळतील, असे वाटत होते. पाच हजारांचा दर महिनाभर राहिला. मात्र, नुकतेच कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचा भाव कोसळला आहे. चांगल्या कांद्याला दर मिळेना. त्यात येणाऱ्या काळात दरात आणखी घसरण होईल, या भीतीने शेतकरी रानातील कांदा काढून कच्चा माल यार्डात आणत आहेत. त्यामुळे मागील चार दिवसांपासून आवक वाढली आहे.

शुक्रवारी लिलाव बंद शनिवारी चालू, रविवारी सुटी आणि सोमवारी लिलाव झाला. १२२५ ट्रक कांद्याची आवक झाली. मात्र, दरात मोठी घसरण झाली होती. पाच हजारांवरील दर ४१०० रुपयांपर्यंत खाली आला होता. सरासरी ही दर २८०० रुपयांवरून २१०० रुपयांपर्यंत खाली आला होता. त्यातून २५ कोटींची उलाढाल झाली. आवक वाढल्याने मंगळवारी लिलाव बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे बुधवारी पुन्हा १००० ट्रक कांद्याची आवक झाली. सरासरी दरात आणखी घसरण झाली. २१०० रुपयांवरून दर १७०० वर पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

अहमदनगर, पुणे जिल्ह्यातून आवक
अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून कांद्याची आवक होत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, बार्शी तालुक्यातून मोठी आवक आहे. विजयपूर, गुलबर्गा जिल्ह्यातून आवक सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!