रत्नागिरी मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रत्नागिरी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना ३ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरातील गोडबोले स्टॉपनजिक घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुपेश जाधव असे हल्ला करण्यात आलेल्या तालुकाध्यक्षाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर हा झालेला हल्ला पक्षांतर्गत वादातून झाला असावा, अशी चर्चा रत्नागिरीमध्ये सुरु आहे. या हल्ल्यामध्ये पक्षातील एका नेत्याचा हात असल्याचा आरोप रुपेश जाधव यांनी केला आहे. दरम्यान या प्रकाराने रत्नागिरी शहरात एकच खळबळ उडाली आहे. मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव हे मंगळवारी त्यांच्या गोडबोले स्टॉप येथे कार्यालयात बसले होते. ते रात्री नऊ वाजता कार्यालय बंद करुन ते बाहेर पडले होते.
दरम्यान, यावेळी मागून येणाऱ्या चार ते पाच जणांनी त्यांच्यावर लाठ्या काठ्यांचा जीवघेणा हल्ला केला. यावेळी रुपेश जाधव यांना तेथील लोकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. जखमी अवस्थेत रुपेश जाधव यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. पक्षातील एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरुन हा हल्ला केला आहे, असा आरोप जखमी रुपेश जाधव यांनी केला आहे. पुढील तपास रत्नागिरी पोलीस करीत आहेत.