Latest Marathi News
Ganesh J GIF

मित्राची आठवण सांगताना फडणवीसांच्या अश्रूंचा बांध फुटला

देवेंद्र फडणवीसांचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल, महाराष्ट्राला दिसले हळवे रुप

पुणे दि १५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राजकीय खेळीसाठी ओळखले जातात. महाविकास आघाडीला त्यांनी आपल्या खेळीने नसमोहरण केले आहे. पण त्याच फडणवीसांचे हळवे रुप आज पहायला मिळाले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शोकसभेत देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर झाले होते. जगताप यांची आठवण सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक झाले होते.

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांवेळी लक्ष्मण जगताप मतदानासाठी आले, याचीच आठवण फडणवीस यांनी सांगितली. ‘इतकी तब्येत खराब असताना पीपीई किट घालून लाईफ सेव्हिंग ऍम्ब्युलन्समध्ये पूर्णपणे झोपून ते आले. आम्ही सगळे जण त्यांना घेण्यासाठी खाली उभे होतो. पीपीई किट आणि मास्क घातलेले लक्ष्मण भाऊ चाचपडत खाली उतरले. तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो, पण मला सॅल्यूट करून म्हणाले, मुख्यमंत्रीसाहेब तुमच्याकरता आलो…’ लक्ष्मण जगताप यांची ही आठवण सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्या अश्रूंचा बांध फुटला. हुंदके देतच त्यांनी भाऊंची आठवण सांगितली. त्यावेळी संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं होतं, काही काळाकरिता सभागृहात शांतता पसरली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या श्रद्धांजली सभेसाठी सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.

या शोकसभेवेळी शहरात लक्ष्मण जगताप यांच्या नावाने यांच्या लॉ कॉलेज त्याचबरोबर कँसर हॉस्पिटलची उभारणी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. कॅन्सर हॉस्पिटलला लक्ष्मण जगताप यांचं नाव देण्याची आमदार महेश लांडगे यांनी केलेली मागणी फडणवीस यांनी तात्काळ मान्य केली. दरम्यान फडणवीस यांचे हळवे रुप महाराष्ट्राला पहायला मिळाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!