
प्रसिद्ध अभिनेत्री या कारणामुळे रुग्णालयात दाखल?
व्हेंटिलेटरवरचा फोटो पाहुन चाहते चिंतेत, या आजारामुळे अभिनेत्री होती त्रस्त
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू अलीकडे बरीच चर्चेत आहे. तसेच सामंथा सोशल मिडीयावर देखील अॅक्टीव्ह असते. ती आपले नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. त्यामुळे काळजी वाढली आहे.
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा ‘शकुंतलम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे काैतुक होत आहे. सामंथाने इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत अभिनेत्री ऑक्सिजन मास्कसह हॉस्पिटलमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. तिचा हा फोटो ऑटोइम्यूनसाठी ‘हायपरबेरिक थेरपी’ दरम्यान काढला आहे. समंथाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘जसा माझा दृष्टिकोन आहे…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सध्या समंथा तिच्या फोटोमुळे चर्चेत आहे. मध्यंतरी सामंथाला मायोसिटिस नावाचा आजार झाला होता. त्यावेळी हॉस्पिटलचा फोटो शेअर करत सामंथाने लिहिले होते की, ‘काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाचा ऑटोइम्यून आजार झाल्याचे निदान झाले. यातून सुटका करून घेतल्यानंतर मी याबद्दल माहिती शेअर करण्यास उत्सुक होती. पण माझ्या अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ घेत आहे. असे ती म्हणाली होती.
सामंथा नुकतीच ‘शकुंतलम’ चित्रपटात दिसली होती. आगामी वेब सीरिज ‘सिटाडेल’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच अभिनेत्रीचा ‘कुशी’ हा तेलुगु रोमँटिक सिनेमा देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्रीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता फक्त साऊथच नाही, तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू प्रचंड प्रसिद्ध आहे.