उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे मराठी उच्चार म्हणजे कानात शिसे ओतणे
ठाकरे गटाच्या महिला नेत्याची पोस्ट व्हायरल, मराठी मनाचे मानबिंदू म्हणत राज ठाकरेंना टोला
मुंबई दि २७ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी आणि शिंदे आणि फडणवीस सरकारच्या नेत्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टीका करत असतात. पण आता अंधारे यांनी अमृता फडणवीस यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे.
एका मुलाखतीवेळी, सुषमा अंधारे या मला माझ्यासारख्या वाटायच्या. मनात असेल ते स्पष्ट बोलायच्या. त्या कुणाला घाबरायच्या नाहीत. जे आहे ते स्पष्टपणे बोलायच्या. मात्र, आता त्यांना जशी स्क्रीप्ट मिळते, तशा त्या बोलतात, असा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला होता. त्यावर अंधश्रध्दा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमृता वहिनींना मी कोणत्या अँगलने त्यांच्या सारखी वाटत असेल बरे?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. हा सवाल करतांनाच त्यांनी अमृता फडणवीस यांच्या मराठी उच्चारांवर जोरदार टीका केली आहे. अमृता फडणवीस यांचे मराठी उच्चार म्हणजे कानात शिसे ओतणे, असं त्या म्हणाल्या. सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही टीका करत अमृता फडणवीस यांचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्याचबरोबर दिसायला तर त्या निश्चितपणे माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. श्रीमंत ही आहेत. बाकी मला नरडं आहे त्यांना गळा आहे. मग काय साधर्म्य असेल आमच्यामध्ये? मग मला कधीतरी वाटलं की कदाचित भाषा प्रभुत्व हे दोघीतलं साम्य असेल का? पण छे! कालची मुलाखत आणि त्यातलं त्यांचं कॉन्टिनेन्टल उच्चारात मराठी ऐकलं अन् खात्री पटली की आमच्यात साम्य असे काहीच असु शकत नाही.”, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. नुकतीच लोकमत वृत्त समुहाच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावरून अंधारे यांनी टोला लगावला.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02Ro7KdC1yqYEHZXuDesCbcyRLM5Gb841jvY3JLpBmwLHckjeVqiWLgzTQZi6z6A4Pl&id=100000324369123&mibextid=ZbWKwL
मराठी मनाचे मानबिंदू असणारे मराठी भाषेचे पाईक, मराठी वाचवाचा ध्यास घेणारे, वेळप्रसंगी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ ची पुस्तके सुध्धा मराठीत व्हावीत यासाठी कृष्णकुंजचे रान हादरवणारे राजदादा यांना, मी बोल्ली, मला चान्स मिळाली, या टाईपच मराठी ऐकुन कानात शिसं ओतल्यासाखं झालं असेल, असा टोला अंधारे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.