
प्रसिद्ध अभिनेत्रीचे लोकप्रिय क्रिकेटपटूवर गंभीर आरोप
मुलाखतीत केला खळबळजनक खुलासा, म्हणाली त्याने मला सांगितलं की मला एकट्यात.....
मुंबई – क्रिकेटपटू आणि बाॅलीवूड आणि खासकरुन अभिनेत्री यांचे नाते नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींबरोबर लग्न देखील केले आहे. पण बाॅलीवूडमधील एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलसा केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
‘बिग बॉस १८’ मध्ये सहभागी झालेल्या कशिश कपूरने क्रिकेटपटूचं नाव न घेता, त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कशिशने नुकतीच फिल्मिग्यानला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान, क्रिकेटपटूबद्दल सांगताना कशिश म्हणाली की, ‘तो खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध क्रिकेटर होता. माझ्यासाठी हा अनुभव खूपच धक्कादायक होता. त्याने मला सांगितलं की मला एकट्यात भेट. मी लगेचच त्याला नाही म्हटलं. क्रिकेटर असशील तू तुझ्या घरी. माझ्यासाठी तू फक्त एक मुलगा आहेस. तू एक क्रिकेटर आहेस फक्त यामुळे मी प्रभावित होणार नाही. कशिश पुढे म्हणाली, “त्याला वाटलं की तो एक क्रिकेटर आहे तर मी लगेचच इंप्रेस होईन. आणि त्याच्यासाठी हे सोपं असेल. त्याची ही गोष्ट मला अजिबातच आवडली नाही. तू क्रिकेटर आहेस तर ते तुझं कामच आहे आणि मी त्याचा आदर करते. पण तू माझ्यासाठी क्रिकेट खेळत नाहीस की मी प्रभावित होईन”. मात्र तिने त्याच्या नावाचा खुलासा केला नाही, परंतु घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. तिने सांगितले की त्या क्रिकेटपटूला तिला प्रत्यक्ष भेटायचे होते. दरम्यान कशिश कपूर हिने ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. तसेच ती काही हिंदी मालिकांमध्येही झळकली आहे.
याआधी जुलै महिन्यात कशिश कपूर हिने मुंबईतील अंधेरी येथील घरी ४.५ लाख रुपये चोरी झाल्याचा आरोप केला होता. तिने आपल्या हाऊसहेल्प सचिन कुमार चौधरी याच्यावर गुन्हा दाखल केली होती. चोरीनंतर तो गायब आहे. आरोपानुसार, कशिशने आपल्या कपाटात ७ लाख रुपये ठेवले होते, जे तिला आईला पाठवायचे होते.