Latest Marathi News

एकनाथ शिंदे म्हणतात ‘लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, फडणवीसच बाॅस?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्याचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असा आरोप विरोधकांकडून नेहमी केला जातो. कारभार फडणवीस पाहतात तर एकनाथ शिंदे केवळ नामधारी मुख्यमंत्री आहेत असा टोला नेहमी लगावला जातो पण आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांचा उल्लेख महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. फडणवीस यांचा मुख्यमंत्री उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत.

स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घटानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. यावेळी दोघांनीही उपस्थित जनतेला संबोधित केले. यावेळी शिंदेनी आपल्या भाषणाची सुरूवात कोकणी भाषेतून केली. मात्र, आपल्या भाषणाला पुढे सुरुवात करताना आणि उपस्थितांचे आभार मानताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला आहे. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राज्याचे लाडके मुख्यमंत्री लोकप्रिय देवेंद्र फडणवीसजी’, असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा पदभार असला तरीही देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचं नियंत्रण होतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याआधीही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचा उल्लेख पंतप्रधान म्हणून केला होता. आता तर मुख्यमंत्री स्वतः फडणवीस मुख्यमंत्री असल्याचे सांगत आहेत. याआधी अमृता फडणवीस यांनी ब्राम्हण असल्यामुळे आज फडणवीस मुख्यमंत्री आहेत असे वक्तव्य केले होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांचा उल्लेख सवयीप्रमाणं मुख्यमंत्री केला होता. लगेचच त्यांनी दुरुस्ती केली होती. आज एकनाथ शिंदेंनी देखील देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!