Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची सेटवरच गळफास घेत आत्महत्या

आत्महत्या करण्यापुर्वीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल, पोस्ट करत म्हणाली....

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. वसई पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील प्रसाधनगृहात गळफास लावून तिने आपले जीवन संपवले. तिच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तुनिषा शर्माने आपल्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. ती सध्या सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत होती.तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर सेटवरील लोकांनी तिला रुग्णालयात नेलं होतं, पण रस्त्यातच तिचं निधन झाले. आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तुनिषाने भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप या टीव्ही मालिकेमधून कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर चक्रवर्ती अशोक सम्राट, गब्बर पूंछवाला, शेर-ए- पंजाब : महाराजा रणजीत सिंग, इंटरनेट वाला लव, इश्क सुभान अल्लाह आणि अलिबाबा: दास्तान-ए-काबूल यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केले तसेच ती ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३ ‘ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने आत्महत्या करण्यापूर्वी सेटवरचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती सेटवर शूटसाठी मेकअप करत होती. सेटवरील या व्हिडीओला तिने ‘स्टे ट्यून’ असं कॅप्शन दिलं होते. पण अचानक आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे.


तुनिषा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय होती. तिचे इन्स्टाग्रामवर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.“तिने नेमकी आत्महत्या का केली तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का त्याचा आम्ही तपास करत आहोत,” अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!