पत्नीच्या त्या त्रासाला वैतागून पतीने घेतला धक्कादायक निर्णय
पोलीस तपासात धक्कादायक खुलासा, पत्नीसह प्रियकराला बेड्या
नाशिक दि २४(प्रतिनिधी)- नाशिक मधील सिडको परिसरात दोन दिवसाआधी एका युवकाने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकरावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी हे दि.२० रोजी घरातून बेपत्ता झाले होते. तेव्हा याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती त्यानंतर दोन दिवसांनी एक मृतदेह बापू पुलानजीक तरंगताना आढळून आला होता.याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली असता तो मृतदेह राकेशचा असल्याची पोलिसांना खात्री झाली. त्यानंतर राकेशच्या नातेवाईकांनी त्यांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप केला. मात्र अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगिरथ देशमुख यांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला.तपास करत असताना धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रियकर आणि स्वतः पत्नी पतीला मानसिक त्रास देत असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
आता याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात राकेश यांची ३० वर्षीय पत्नी व तिचा प्रियकर रिझवान मन्सुरी यांच्यांतील अनैतिक संबंधामुळे मानसिक तणावात आल्याने राकेश यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत खतेले करीत आहेत.