Just another WordPress site

काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला

महिला लोकप्रतिनिधी सुरक्षा वा-यावर,पोलीसांच्या कारवाईकडे लक्ष

हिंगोली दि ९(प्रतिनिधी) – माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.

आमदार प्रज्ञा सातव या कसबे दवंडा गावामध्ये गेल्या असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. एका व्यक्तीने आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणामध्ये आखाडा बाळापूर पोलिसांनी तत्काळ हल्लाखोराला ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा या हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्याची माहिती देताना प्रज्ञा सातव म्हणाल्या की, “संध्याकाळी ८ वाजता कसबे दवंडा या गावात असताना एक अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीजवळ आला. नियोजित कार्यक्रमाच्या स्थळी असताना, मी भाषण देत असताना एक व्यक्ती मागून आला, मला त्यानं ओढलं आणि हल्ला केला. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहणार आहे. कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता. असा दावा देखील सातव यांनी केला आहे. दरम्यान तिथे उपस्थित लोकांनी या व्यक्तीला पकडले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले.

GIF Advt

सातव यांच्यावरील हल्ल्याचा राज्यातील लोकप्रतिनिधीनी निषेध केला असुन सातव यांना अधिकची सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. दरम्यान मी काम करू नये, मला मागे ओढण्याचा हा प्रयत्न असू शकतो. मी कधीही मागे हटणार नाही, जनतेची अविरत काम करत राहील असं प्रज्ञा सातव यांनी म्हटलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!