कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होणार?
शिवसेनेमुळे निवडणूक रद्दची कारवाई होणार, बघा नेमका काय घोळ झाला
पुणे दि ९(प्रतिनिधी)- मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधानामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. प्रचाराची रणधुमाळी देखील सुरु आहे अशातच शिवसेनेमुळे ही निवडणूक रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना कोणाची यावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. त्याचबरोबर आमदार अपात्रतेबाबत न्यायालयात १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सुनावणी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले “सर्वोच्च न्यायालयाने १४ किंवा १५ तारखेला निकाल देत महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त केली; अथवा हे सरकार चुकीचं आहे, असा निर्णय दिला. तर, राष्ट्रपती राजवटी शिवाय पर्याय. नाही. अशावेळी कलम १७२ नुसार विधानसभा टिकत नाही. त्यामुळे विधानसभा विसर्जित झाल्याने निवडणुकीचे आयोजन होऊ शकत नाही. त्यामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची कार्यवाही तात्काळ थांबवावी लागेल” असे सरोदे म्हणाले आहेत. त्यामुळे आता १४ तारखेला होणाऱ्या सुनावणीकडे अधिक लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे. शिवसेना वादात आता भाजपाला हक्काच्या जागा सोडाव्या लागतील ही भिती निर्माण झाली आहे.
ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना “त्या १६ आमदारांनी पळून जात पक्षाविरोधी काम केलं. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सर्वोच्च न्यायालयात नक्की होणार आहे. ती झाली तर सरकार कोसळणार, अशी शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.