Just another WordPress site

बापाने पोटच्या पोरांना विष पाजून मारले

हत्या करणा-या नराधम बापाचा पोलीसांकडून शोध सुरू

चंद्रपूर दि ३ (प्रतिनिधी) – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा शहरालगत असलेल्या बोर्डा गावात जन्मदात्या पित्यानेच दोन मुलांना विष पाजून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर त्या नराधम बाप फरार झाला आहे.

GIF Advt

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय श्रीराम कांबळे हा खाजगी शिकवणी वर्ग चालवितो, तर त्याची पत्नी ही शहरातील एका महाविद्यालयात क्लर्क आहे. घटनेच्या दिवशी मुलगा अस्मित हा शाळा सुटल्यानंतर जवळच घर असलेल्या आजीकडे गेला होता. संजयने त्याला घरी आणले. तर लहान मुलगी मिस्टी ही नुकतीच शाळेतून आली होती. संजयने दोन्ही मुलांना आत मध्ये कोंडून त्यांना विष पाजले. तेवढ्यावरच त्याचे समाधान झाले नाही. तर त्याने दोन्ही मुलांचा गळा आवळला, आणि ते मृत पावले याची शहानिशा करून बाहेरून दाराला कुलूप लावून तेथून पळ काढला. आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

सायंकाळी पाच वाजताच्या मुलांची आई घरी आली असता तिला दोन्ही मुले बिछान्यावर निपचीत पडली होती. त्यांच्या तोंडातून फेस येत होता, हालचाल बंद होती. तिने लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांना वरोडा उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी दोन्ही मुलांना तपासले असता त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. पोलीसांकडून निर्दयी बापाचा शोध सुरु आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!