नात्यातील मुलीबरोबर प्रेम झाले, पण विरोध होताच अघटित घडले
मुलीच्या आईच्या नकारामुळे प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल, नांदेड जिल्ह्यात उडाली खळबळ
नांदेड दि ६(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे धक्कादायक घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या चुलत बहिण- भावाचं एकमेकांवर प्रेम जडले होते. पण अखेर या नात्याचा खुनाने अंत झाला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रेमविवाहाला कुटुंबीयांनी नकार दिल्याने एका प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहिदास जाधव आणि सुप्रिया जाधव हे नात्याने भाव बहीण आहेत. सुप्रिया बी.ए प्रथम वर्षात शिक्षण घेत होती, तिची आणि रोहितच भेट होत असायची या भेटीचे काही काळाने प्रेमात रूपांतर झाले. रोहिदासच्या वडिलांनी आपल्या मुलाचे आणि सुप्रियाचे लग्न करु देऊ असा प्रस्ताव मांडला. परंतु लक्ष्मीबाई आणि नातेवाईकांनी त्याला विरोध दर्शविला. त्यामुळे रोहित तणावात होता. त्यामुळे घटनेचा दिवशी तो मध्यरात्री सुप्रियाच्या घरी गेला. पण तिच्या आईला अचानक जाग आल्याने त्या बाहेर आल्या पण सुप्रिया त्यांना तिच्या खोलीत दिसली नाही. थोड्या वेळाने सुप्रिया बाथरूमधून बाहेर आली आणि तिच्या मागोमाग रोहिदास जाधव हा देखील बाहेर आला. काही वेळातच सुप्रियाला उलट्या होऊ लागल्या. लक्ष्मीबाई यांनी तिची विचारपूस केली असता तिला रोहिदासने स्प्राईटच्या बाटलीमध्ये आणलेले कोणतेतरी विषारी औषध पाजले असल्याचे सांगितले त्यानंतर हा प्रकार समोर आला. पण रोहितने फोन करत आपणही विष पिल्याचे सांगितले.
आईने लग्नास नकार दिल्याने रोहिदास जाधव याने स्प्राईटमधून तरुणीला विष पाजले. त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. यामध्ये सुप्रियाचा मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर रोहिदास जाधवला तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. रोहिदासवर सध्या उपचार सुरू आहेत. लक्ष्मीबाई जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उस्माननगर पोलिस ठाण्यात आरोपी रोहिदास पद्माकर जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रियाचा मृत्यू झाला असून रोहितची मृत्यूबरोबर झुंज सुरु आहे.