Latest Marathi News
Ganesh J GIF

रिक्षाचालकाबरोबरचा वाद महिलेला पडला महागात

महिलेसोबत घडलेली थरारक घटना सीसीटीव्हीत कैद, रिक्षाचालकाचा वेगळाच दावा, संशयाला जागा?

कोल्हापूर दि ६(प्रतिनिधी)- रिक्षावाल्याबरोबरचे वाद नवीन नाहीत. अनेकदा भाडे नाकारणे, किंवा पैशावरून वादावादी नेहमीच होत असते. पण कोल्हापूरात मात्र एका महिलेला रिक्षावाल्याबरोबरचा वाद चांगलाच महागात पडला आहे. कारण रिक्षासोबत फरफटत केल्याने महिला जखमी झाली आहे.

कोल्हापुरातील राजारामपुरी येथे हा विचित्र अपघात घडला आहे. घटनेच्या ठिकाणी एका महिलेचा आणि रिक्षाचालकाचा वाद झाला. त्यानंतर रिक्षाचालक निघून जात असताना महिलेची साडी रिक्षात शेकल्याने ती फरफटत गेली. यावेळी अनेकांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण रिक्षाचालकाने तशीच रिक्षा चालवल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. काही अंतरावर गेल्यावर रिक्षा चालकाने रिक्षा थांबवली. या घटनेत महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणाबद्दल रिक्षा चालकाकडे विचारपुस केली असता त्याला या सगळ्याची कल्पना नसल्याचं त्याने सांगितले. पण रिक्षामागे काही लोक पळत होते आणि आवाज देखील करत होते. ते देखील रिक्षा चालकाला ऐकू आलं नसेल का? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!