भारताच्या इतिहासातील केंद्रीय अर्थसंकल्प सादर न अर्थमंत्री
'या' दिग्गज नेत्याचाही समावेश, या पंतप्रधानांनी मांडला होता अर्थसंकल्प
दिल्ली दि १(प्रतिनिधी)- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री साधारणपणे आपला अर्थसंकल्प सादर करत असतात. पण भारतात असे तीन अर्थमंत्री होऊन गेले ज्यांना अर्थमंत्री असूनही अर्थसंकल्प सादर करता आला नाही. याच नावाची आपण आता चर्चा करणार आहोत.
अर्थमंत्री असूनही अर्थसंकल्प न मांडणाऱ्या तीन अर्थमंत्री आहेत. क्षितिज चंद्र नियोगी, हेमवती नंदन बहुगुणा आणि नारायण दत्त तिवारी यांना अर्थसंकल्प सादर करता आला नाही.
क्षितीज चंद्र नियोगी- नियोगी हे देशाचे दुसरे अर्थमंत्री होते. त्यांनी आरके षण्मुखम चेट्टी यांची जागा घेतली होती. नियोगी यांनी ३५ दिवसांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अशा स्थितीत त्यांना अर्थसंकल्प मांडण्याची संधीही मिळाली नाही. नियोगी हे संविधान सभेचे सदस्य होते. ते नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे सदस्यही होते. १९४८ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
हेमवती नंदन बहुगुणा- हेमवती नंदन बहुगुणा यांचा अल्प कार्यकाळ हेही अर्थसंकल्प सादर न करण्याचे कारण होते. बहुगुणा १९७९ मध्ये इंदिराजींच्या सरकारचे अर्थमंत्री झाले. त्यांचा कार्यकाळ साडेपाच महिन्यांचा होता. त्यामुळे त्यांना अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली नाही.
नारायण तिवारी- नारायण दत्त हे १९८७-८९ या कालावधीमध्ये अर्थमंत्री होते. नारायण दत्त अर्थमंत्री असताना राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यावेळी मजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी नारायण दत्त तिवारी यांच्या जागी अर्थसंकल्प सादर केला होता.त्यामुळे त्यांना अर्थसंकल्प सादर करता आला नाही. नारायण दत्त तिवारी हे त्याकाळचे दिग्गज नेते मानले जायचे.