Latest Marathi News
Ganesh J GIF

खुशखबर! सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त

यंदाचा अर्थसंकल्प सादर बघा अर्थसंकल्पात काय महाग काय स्वस्त

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही.यापूर्वी ही मर्यादा ५ लाख रुपये होती. मात्र जेष्ठ नागरिकांना कोणताही वेगळा दिलासा आता मिळणार नाही.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात टॅक्स स्लॅबबाबत घोषणा केली. आता, सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. नवीन कर प्रणालीनुसार कर रचना असणार आहे. ५ स्लॅबमध्ये ३ लाखांपर्यंत कोणताही कर नसेल. तसेच ३ ते ६ लाखांपर्यंत ५ टक्के, ६ ते ९ लाखांपर्यंत १० टक्के, ९ ते १२ लाखांपर्यंत १५ टक्के, १२ ते १५ लाखांपर्यंत २० टक्के आणि १५ लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर असेल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे. केंद्र सरकराने २०२० साली नवी ऐच्छिक इनकम टॅक्स योजना जाहीर केली होती.कर भरणा सुटसुटीत व्हावा या उद्देशाने ही योजना लागू करण्यात आली होती. यामध्ये इनकम टॅक्सचे ६ नवीन स्लॅब करण्यात आले आणि स्लॅबनुसार इनकम टॅक्सचे दर कमी करण्यात आले. पण गृहकर्ज आणि विमा यांची इनकटॅक्सची सवलतची तरतुद या योजनेत नसल्याने अनेकांनी याकडे पाठ फिरवली होती.


काय स्वस्त काय महाग
स्वस्त होणार?
१) एलईडी टीव्ही
२) टीव्हीचे सूटे भाग
३) इलेक्ट्रिक वस्तू
४) मोबाईल फोन, पार्ट्स
५) इलेक्ट्रिक वाहने
६) खेळणी
७) कॅमेरा लेन्स

काय महाग?

१) सोन्याचे दागिने
२) चांदीचे दागिने
३) चांदीची भांडी
४) विदेशी किचन चिमणी
५) सिगरेट

यावेळी निर्मला सीतारामन यांनी सीमाशुल्क, सेस आणि सरचार्जमध्ये बदल जाहीर केले. परदेशातून आयात होणाऱ्या खेळण्यांवरील सीमाशुल्क १३ टक्क्यांनी घटवण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!