आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जनतेला वीज दरवाढीचा शॉक
घरगुती वीजेच्या दरात तब्बल 'एवढी' वाढ, पहा नवीन दर काय असणार
मुंबई दि १(प्रतिनिधी)- इंधन आणि गॅस दरवाढीमुळं आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्यांना आता वीज कंपन्यांनी आणखी एक मोठा दणका दिला आहे. कारण आता महाराष्ट्रातील वीज वितरण कंपन्यांनी प्रतियुनिट वीजेच्या दरात मोठी वाढ केली असून त्याचे नवे नियम आजपासून लागू केले आहेत.
MSEDCL च्या ग्राहकांना २०२३-२४ मध्ये सरासरी २.९ टक्के तर २०२४-२५ साठी ५.६ टक्के दरवाढ केली आहे. घरगुती वीजेच्या दरात २०२३-२४ साठी सहा टक्के तर २०२४-२५ साठी सहा टक्के वाढ झाली आहे. तर बेस्टच्या ग्राहकांना २०२३-२४ साठी वीज दरात सुमारे ५.०७ टक्के तर २०२४-२५ साठी ६.३५ टक्के अधिक मोजावे लागणार आहेत. टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी २०२३-२४ साठी ११.९ टक्के वाढ झाली आहे. तर २०४-२५ साठी १२.०२ टक्के वाढ झाली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना २०२३-२४ साठी सरासरी २.२ टक्के तर २०२३-२४ साठी २.१ टक्के अधिक मोजावे लागणार आहेत. महावितरणच्या कराराअंतर्गत विजेने कमाल मर्यादा गाठली आहे. परिणामी राज्य सरकारी कंपनीला किमान दोन हजार मेगावॉट वीज बाहेरून खरेदी करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळं विजेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान आधीच वीजबिलांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या महावितरणला वीजदरात वाढ केल्यामुळे काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण सध्या राज्यात उन्हाळा चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा वाढल्यानं वीजेची मागणीही सगळीकडे खूप वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना चांगलाच शाॅक बसला आहे.
महावितरण कंपन्यांचे ग्राहकांसाठीचे वीजदर पंचवार्षिक असतात. त्यानंतर या दरांचा मध्यकालीन आढावा घेतला जातो. सध्याचे दर एक एप्रिल २०२० पासून लागू झाले आहेत. त्यानुसार त्यांचा आता मध्यकालीन आढावा घेतला जात असून विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यास या वर्षी एक एप्रिलपासून नवीन दर लागू होऊ शकतात.