Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात भरधाव कारने पाच महिलांना चिरडले

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर, व्हिडिओ पाहुन उडेल थरपाक, चालक अटकेत

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात घडला होता. खेडजवळ अज्ञात कारने महिलांना धडक दिली आहे. या धडकेत पाच महिलांचा मृत्यू झाला होता. तर, तीन महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

अपघातग्रस्त महिला महामार्गापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात स्वयपाकाचे काम करत होत्या. घटनेच्या ठिकाणी मध्यरात्री काम संपल्यानंतर त्या पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या होत्या. त्या पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता ओलांडत असताना या महिलांच्या घोळक्याला पुण्याकडून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यातील तीन ते चार महिला फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या. या भीषण अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर बाकीच्या महिला गंभीर जखमी झाल्या होत्या.घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता पण नंतर कारसह कार चालकाला राजगुरुनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर शिरोलीतील खरपुडी फाट्यावर महिलांना चिरडुन झालेल्या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

पोलिसांनी तातडीने मदत पुरवल्याने जखमी महिलांना लवकर उपचार मिळाले. प्रशासकीय यंत्रणेसोबत तातडीने संपर्क करुन जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!