Latest Marathi News
Ganesh J GIF

आग्रा किल्ल्यावर घुमणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यास परवानगी, शिवप्रेमींचा उत्साह शिगेला

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- ऐतिहासिक आग्र्याच्या किल्ल्यावर येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार आहे.केंद्रीय पुरातत्व विभागानं यासाठी परवानगी दिली असून यासाठी आर आर पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील यांनी या विरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. महाराष्ट्रासाठी आणि तमाम शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी ठरली आहे.

आग्रा येथील लाल किल्ला मधील दिवान-ए-आम सभागृाहतच यंदा १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होणार आहे.आयोजकांची कोर्टात धाव याआधी या कार्यक्रमाला पुरातत्व खात्याने परवानगी नाकारली होती. याविरोधात विनोद पाटील यांनी दिल्ली न्यायालयात धाव घेतली. यासंदर्भात निकाल देताना न्यायालयाने राज्य सरकार सहआयोजक असल्यास आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल असा निर्णय दिला होता. त्यानंतर राज्य सरकारनेही पत्र पाठवून आपण सहआयोजक आहोत असे कळवले. त्यानंतर पुरातत्व खात्याने जयंती सोहळ्याला परवानगी दिली आहे. राज्य सरकार आयोजक असल्याने या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशन या शिवजयंतीचा पूर्ण खर्च करणार आहेत. राज्य सरकार फक्त कागदोपत्री आयोजक असणार आहे.

आग्र्यामध्ये छत्रपती शिवरायांना औरंगजेबाकडून कैद करण्यात आलं होतं आणि त्यातून महाराजांची सुटका कऱण्याची ऐतिहासिक घटनाही घडली होती. याच घटनेला उजाळा देण्यासाठी आग्र्यात शिवजयंती साजरी करण्याचं या संस्थेनं ठरवलं होतं. अखेर कायदेशीर लढाईनंतर शिवजयंती साजरी करण्यास परवानगी मिळवण्यात यश आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!