
काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख राष्ट्रवादीत जाणार?
काँग्रेसच्या कारणे दाखवा नोटीसीनंतर काँग्रेसलाच धक्का देणार, आघाडीत वाद होणार?
नागपूर दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुखांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावत तीन दिवसांचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल केलेले विधान देशमुखांना चांगलंच महागात पडले आहे. उत्तर देईपर्यंय देशमुख यांचे निलंबन करण्यात आले आहे. पण या नोटीसला उत्तर न देता आशिष देशमुख मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून एक खोका दिला जातोयं. मुख्यमंत्री शिंदे लवकरच गुवाहाटीला असतील, एकनाथ शिंदेंकडून नाना पटोले यांना एक खोका दिला जातोय, असा दावा आशिष देशमुख यांनी होता. त्यानंतर पक्षाच्या शिस्तपालन समितीकडून आशिष देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पण याच पार्श्वभूमीवर आशिष देशमुख लवकरच काँग्रेस पक्षाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा रंगली आहे.काँग्रेस नेते आशिष देशमुख हे लवकरच नागपुरात राष्ट्रवादीची बैठक घेणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हिंगणा मतदारसंघात भाजपविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीकडून तगडा उमेदवार म्हणून देशमुख आपली दावेदारी सादर करु शकतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर पोहोचले होते. त्यावेळी आशिष देशमुख यांनी त्यांची भेट घेतली होती. जर आशिष देशमुख राष्ट्रवादी गेले तर नाना पटोले विरुद्ध आशिष देशमुख वादावर पडदा पडणार की नवा अंक सुरु होणार याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आशिष देशमुख यांच्यावर पक्ष कारवाई करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आज अखेर काँग्रेसच्या बैठकीत देशमुख यांचं उत्तर येईपर्यंत त्यांचं ते काँग्रेस पक्षातून निलंबित असणार आहेत. या बैठकीला काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.