शरद पवार यांच्याविषयी संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
शिवसेनेतल्या 'त्या' अकरा आमदारांवर संजय राऊत यांचा आरोप, बघा नेमके काय म्हणाले
अ. नगर दि ७(प्रतिनिधी)- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्जत-जामखेड येथील पत्रकार संमेलनाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. त्याचबरोबर त्यांनी राजकीय घडामोडीवर आपल्या परखड शैलीत भाष्य केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकच शरद पवारांना स्थान देतो. नक्कीच मला बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं, मला या क्षेत्रात उभं केलं. पण शरद पवार देखील माझ्यासाठी आधारस्तंभ आहेत. पवारांना काळोखात भेटणे, हायवेवर भेटणे असं होत नाही. निकाल पूर्ण लागलेही नव्हते तेव्हा शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली. मी तिथून थेट शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकला गेलो. सरकार बनवण्यासाठी आलोय असं म्हटलं. लपवले कुठे? आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत हे उद्धव ठाकरेंनी सांगितले. हा संदेश स्पष्ट होता असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावेळी १४० कोटी जनता असलेल्या भारतातील लोकशाहीला खड्ड्यात घालण्याचं काम मोदी-शाह करतायेत असा आरोप राऊतांनी केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेतून फुटलेले ११ आमदार, नऊ खासदार यांना ईडी, सीबीआयचे समन्स आहेत, त्यांचे खटले थांबवले आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याशिवाय आदित्य ठाकरे कुठूनही उभे राहिले तर निवडून येतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे किस झाड की मूली’, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली होती. त्यासंबंधी खासदार राऊत म्हणाले, कोण नवनीत राणा! परत त्या निवडणुकीला उभ्या राहू द्या. मग अहंकार काय, कोण कोणत्या झाडाची मुळी हे कळेल.असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
भीमा -पाटस सहकारी साखर कारखान्यासंबंधीचे आरोप राजकीय नाहीत. या कारखान्यात ५५० कोटींचे मनी लॉण्डरिंग झालेले आहेत, यासंबंधी सीबीआय संचालकांना पत्र देत चौकशीची मागणी करणार असल्याचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.