Latest Marathi News
Ganesh J GIF

मित्र सरपंच होताच मित्रांकडून नवीकोरी फॉर्च्युनर गाडीची भेट

पुण्याजवळील केसनंद गावातील मैत्रीची सगळीकडे चर्चा, मित्र सरपंच झाल्यानंतर जल्लोष

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुणेकर नेहमीच आपल्या अनोख्या शैलीमुळे ओळखले जातात.कदमवाक वस्तीमध्ये आपला मित्र सरपंच होण्यासाठी नवस केल्याची घटना ताजी असतानाच केसनंद गावात केसनंद गावाचे नवनिर्वाचित सरपंच दत्तात्रय हरगुडे यांना आपल्या मित्रांनी सरपंचकी मिळताच थेट फॉर्च्युनर कार भेट दिली आहे. याची जोरदार चर्चा होत आहे.

पुण्याला लागूनच असलेल्या केसनंद गावात सरपंचपदी दत्तात्रय हरगुडे तर उपसरपंचपदी सुरेखा बांगर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आपला मित्र सरपंच झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी करत मित्रांनी जोरदार जल्लोष केला. ते एवढ करुन थांबले नाहीत तर त्यांनी सरपंच मित्राला तब्बल ४५ लाखांची कार भेट दिली आहे. मित्रांच्या हाकेला धावून जाणारा अशी दत्तात्रय हरगुडे यांची ओळख आहे.लोकांच्या कामासाठी त्यांच्या पायाला सतत भिंगरी असते म्हणून त्याच्या या गतीला आणखी गती मिळावी म्हणून आम्ही मित्रांनी ही गाडी भेट दिली आहे, असे दत्तात्रय हरगुडे यांच्या मित्रांनी सांगितले आहे. केसनंद गावातील एका सामान्य कुटुंबातील आलेल्या दत्तात्रय हरगुडे सरपंच झाल्याने मित्रांनी आनंद व्यक्त केला आहे. पण अनोख्या भेटीमुळे ५५ हजार लोकसंख्या असलेले केसनंद गाव चांगलेच चर्चेत आहे.

मित्रांनी आजपर्यंत मला प्रत्येक वेळेस सहकार्य केल आहे. २०१० पासून केसनंद गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरलो तेव्हापासून सरपंच होण्याचे आपले स्वप्न होते.या भेटीच्या मार्फत मित्रांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र होण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल असा विश्वास दत्तात्रय हरगुडे यांनी व्यक्त केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!