
बीड दि ३ (प्रतिनिधी)- बीड शहरातील तुळजाई चौकात भर रस्त्यात दोन गटामधील युवकांमध्ये गँगवारची घटना समोर आली आहे. यावेळी हाणामारीचा सर्वप्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.यावेळी धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला यात एकजण जखमी झाला आहे.
तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वादामध्ये धारदार शास्त्राने एका तरुणावर ८ तरुणांनी हल्ला केला. कुणाल ढोले अस जखमी तरुणाच नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बीडमध्ये अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांचा जरब कमी झाला की काय असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे.
बीड शहरात पंधरा दिवसांपूर्वीच खंडेश्वरी परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच तुळजाई चौकामधील घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.