
सोलापूर दि ३ (प्रतिनिधी)- पैशाने माजलेला बोकड म्हणजे तानाजी सावंत आहे. त्याची पाच हजार कोटीची संपत्ती आहे. त्यावर ईडी कारवाई का करत नाही. ज्या तानाजी सावंताला पक्षप्रमुखांनी विधान परिषदेवर आमदार केले, मंत्री केले, तो सावंत विचारतो की, कोण आदित्य ठाकरे? या तानाजी सावंताला सोलापुरातील शिवसैनिक चप्पलने मारल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया सोलापूरातील शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे बंडखोर विरुद्ध शिवसैनिक हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
पुण्यात बंडखोर आमदार उदय सामंत यांची गाडी फोडण्यात आली. यावेळी एका शिवसैनिकाने आम्हाला तानाजी सांवतची गाडी फोडायची होती चुकून उदय सामंत यांची गाडी फोडली असं सांगितल होत. तानाजी सांवत यांनी आदित्य ठाकरेंवर टिका करताना कोण आदित्य ठाकरे फक्त एक आमदार आहे. पुढच्यावेळेस आमदार देखील नसतील असे वक्तव्य केले होते. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तीवरे धरण हे खेकड्यांनी फोडलं असं म्हणणारा तानाजी सावंत याला फक्त पैशाची मस्ती आहे, अशी बोचरी टीका शिवसैनिकांनी केली आहे.
आमदार शाहजीबापू पाटील यांच्यावरही शिवसैनिकांनी टीका केली आहे. शहाजीबापू पाटील हे स्वतःला छत्रपतींचा वंशज समजतात पण बायकोला साडी घेता येत नाही. असे लोक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आरोप करत असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.