माॅडलिंग ते सर्जरी राखी सावंतची तुलना उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी
महाराष्ट्राच्या राजकारणात राखी सावंतची एंट्री, महाराष्ट्रात रंगले तुलनेचे राजकारण
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकारण सध्या कोणत्या दिशेला चालले आहे ते सांगता येत नाही. पण सध्या राज्याच्या राजकारणात अभिनेत्री राखी सावंत चर्चेत आली आहे. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटात वाद रंगला आहे.
भाजपा नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि अभिनेत्री राखी सावंत या बहिणी असल्याचा दावा केला होता. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात, तर दुसरी बहीण महाराष्ट्राच्या सिनेमात, दोन्ही बहिणी एकमेकींशी स्पर्धा करत असतात की रोज सगळ्यात जास्त सनसनाटी कोण निर्माण करेल, असा टोला मोहित कंबोज यांनी लगावला होता. त्यावर आता अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पण यावेळी या वादात त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाही ओढले आहे. कंबोजची प्रवृत्ती चांगली नाही. त्याची प्रवृत्ती चांगली असती, तर राखी सावंतची तुलना अजून कोणशीतरी केली असती. पण, राखी सावंतची तुलना फक्त अमृता फडणवीस यांच्याबरोबर होईल. कारण, दोघींच्या चेहऱ्याची सर्जरी झाली आहे, दोघीही गायक आहेत. त्याचबरोबर राखी सावंत मॉडेल आहे… अमृता वहिनी सुद्धा मॉडेल आहेत,” असा टोमणा सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. यावेळी अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर देखील टिका केली आहे.
राखी सावंत यांनी देखिल कंबोज यांचा समाचार घेत पर आपले नाव राजकारणासाठी वापरलात तर याद राखा असा दम दिला आहे. त्याचबरोबर तुमच्या सारखे राजकारणी खुर्चीसाठी नाटकं करतात, थोडीतरी लाज वाटू द्या असे राखी म्हणाली आहे.