Latest Marathi News
Ganesh J GIF

‘….म्हणून मी कालचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते’

अजित पवार यांनी स्पष्ट केले नाॅट रिचेबल असण्यामागचे कारण, बघा काय घडले होते

पुणे दि ८(प्रतिनिधी)- सत्तांतर होत असताना अनेक नेत्यांचे फोन हे नाॅट रिचेबल लागतात. पण काल अचानक अजित पवारांचा फोन सुद्धा नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. पण आता अजित पवार यांनी मिडीयासमोर येत या वादावर पडदा टाकला आहे. पण यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवर आपली नाराजीही व्यक्त केली.

अजित पवारांचा फोन शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. पण एका सोन्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला उपस्थित राहत या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, “जागरणं, दौरे जास्त झाली की मला पित्ताचा त्रास व्हायला लागतो. हे आजचं नाही तर नेहमीचं आहे. मला कसंतरी व्हायला लागलं, त्यामुळे मी जिजाईवर जाऊन डॉक्टरांकडून गोळ्या आणून घेतल्या आणि शांतपणे झोपलो. सकाळपासून मी कार्यक्रमांना सुरुवात केली. मला इतकं वाईट वाटत होतं. अजित पवार नॉट रिचेबल वगैरे काही पण दाखवत होते. तुम्ही आधी खात्री करुन घ्या, कारण नसताना एखाद्याची किती बदनामी करायची, आम्ही पब्लिक फिगर असल्याने तुम्हाला अधिकार आहे, पण शेवटी आम्ही माणूसच आहोत, असे अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान अजित पवार शुक्रवारी रात्री अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अजितदादांचं पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या शोरुमच्या उद्घाटनाला सपत्नीक दर्शन झाले, आणि उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला.

शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी एखाद्या विषयावर भूमिका मांडली की त्यावर आम्ही कोणी काही बोलू शकत नाही. तीच पक्षाची भूमिका असते. त्यामुळे गौतम अदानी जेपीसी चौकशी प्रकरणावर त्यांची भूमिका अंतिम असेल, असे म्हणत शरद पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!