Latest Marathi News
Ganesh J GIF

सबसे कातील गाैतमी पाटीलच्या अदांचा पंजाबमध्ये जलवा

गाैतमीचे रोमँटिक 'तेरा पता' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, गाैतमीचा लुकने चाहते घायाळ

पुणे दि २६(प्रतिनिधी)- आपल्या साैंदर्याने आणि डान्समुळे तरुणाईच्या मनात घर केलेली गाैतमी पाटील सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.पुण्यातील एका स्टेजशो दरम्यान गाैतमीचा कपडे बदलताना अश्लील चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पण तरीही गाैतमीने या अडचणींना मागे टाकत पंजाबमध्ये आपला जलवा दाखवला आहे.


गौतमी पाटील तिच्या डान्ससोबतच तिची सुंदरता आणि फॅशनसाठी ओळखली जाते. गौतमीचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, आता गौतमीनं पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. गौतमीचा एक पंजाबी अल्बम प्रदर्शित झाला आहे. तिच्या या अल्बमने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिच्या ‘तेरा पता’ या अल्बमला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या अल्बममध्ये गौतमी एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. मराठीत लोकप्रियता मिळवल्यानंतर पंजाबी गाण्यांमध्ये गौतमी चमकत असल्याचे पाहून तिचे अनेकांनी कौैतुक केलं आहे. तर काही जण तिच्या या गाण्यातील पेहरावावरुन तिला ट्रोल केले आहे. गौतमी पाटीलची लवकरच सिनेसृष्टीतही एन्ट्री करणार आहे. ‘घुंगरू’ असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामध्ये गौतमीच्या नृत्यासह तिचा अभिनय देखील पाहता येणार आहे. यस चित्रपटाचे शुटींग सोलापूर, माढा आणि हंपी आणि थायलंडमध्ये होणार आहे. चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान गाैतमीचा एक प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाला असून याविरोधात तिने अज्ञात व्यक्तीविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्रासह देशभरात सध्या डान्सर गौतमी पाटीलचं नाव चर्चेत आहे. तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जात असला तरी तिची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.लावणी कलाकार गौतमी पाटील गेल्या वर्षभरापासून चर्चेचा विषय आहे. गौतमीच्या कार्यक्रमांची चर्चा झाली नाही असे कधी झालेले नाही. पण सध्या गाैतमीचा महाराष्ट्राबरोबरच पंजाबमध्येही कातील अंदाजातील जलवा पहायला मिळाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!