Just another WordPress site

गौतमी पाटीलच्या तीन गाण्याला तीन लाख अन् आम्हाला फक्त टाळ..

डान्सर गौतमी पाटीलवर इंदुरीकर महाराज स्पष्टच बोलले, बघा नेमक काय घडल

बीड दि २६(प्रतिनिधी)- गाैतमी पाटील या नावाची गेल्याकाही दिवसांपासून राज्यभरात चर्चा सुरू आहे. राज्यातील तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की प्रचंड गर्दीचा माहोल असतो. पण आता गाैतमी पाटीलवर इंदूरीकर महाराज यांनी निशाना साधला आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन होते. या कीर्तनात बोलताना इंदुरीकर महाराज यांनी म्हटले की, समाजाती मानसिकता प्रतंड बदलली आहे. आम्ही कीर्तनाच्या कार्यक्रमाला पाच हजार मागितले तर महाराजांनी पैशांचा बाजार मांडला म्हणतात. पण, त्या ठिकाणी गौतमी पाटील हिने तीन गाणी वाजवली तर तिला तिन लाख द्यायला तयार होता. इकडे आम्हाला टाळ वाजवून काहीच नाही. तिच्या कार्यक्रमासाठी लोकं झाडावर चढतात. काही मारामारी करतात, काहींचे गुडघे फुटटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीच नाही. साधं संरक्षण मागितलं तरी ते मिळत नाहीत, असे म्हणत इंदुरीकर महाराज यांनी गौतमीवर भाष्य केले आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या वाढदिवसासाठी गौतमी पाटीलचा डान्स ठेवल्याचे समोर आले होते. तसेच लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता. कलावंत पोट भरण्यासाठी धडपडतो. पोटासाठी प्रत्येकजण काहीतरी करतो. मात्र जे करायचे आहे, ते चांगले करावे. गौतमी पाटील हिची लावणी नसून डीजे डान्स आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

GIF Advt

सध्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत आहे. तसेच गौतमी पाटील सर्वाधिक मानधन घेते. एका कार्यक्रमासाठी ती तब्बल तीन लाखाच्या पुढे रक्कम घेते. तरी देखील अनेकजण खर्च करून तिचा कार्यक्रम ठेवतातच. यामुळे तिची नेहेमी चर्चा होते.असे असले तरी तिच्या कार्यक्रमात होणार गोंधळ, तिचे हावभाव, तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जातो.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!