Latest Marathi News
Ganesh J GIF

म्हणून ही अभिनेत्री घरातील मोलकरणीच्याही पाया पडते

अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, कारण एैकुन तुम्ही म्हणाल संस्कार असावे तर असे!

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी साऊथ सुंदरी रश्मिका मंदाना सध्या बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.

रश्मीकाला अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. रश्मिका मंदानाने नुकतीच ‘बाजार इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक किस्से सांगितले. कुटुंबियांना भेटायला गेल्यानंतर रश्मिका घरातील सगळ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेते. घरकाम करणाऱ्या मोलकरणीलाही रश्मिका नमस्कार करत असल्याचं तिने सांगितले.कारण मला घरातील इतर व्यक्ती आणि तिच्यात फरक करायला आवडत नाही. मी सर्वांचा आदर करते. एक व्यक्ती म्हणून मी अशीच आहे.” असे ती म्हणाली आहे. त्याचबरोबर माझ्यासाठी छोट्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. मी सकाळी उठते आणि माझ्या पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवते. मी माझ्या मित्रांना भेटते, यामुळे मला आनंद होतो. शब्द खरोखर शक्तिशाली असतात आणि ते एखाद्या व्यक्तीला जोडू किंवा तोडू शकतात, म्हणूनच जेव्हा कोणी काही बोलतो तेव्हा ते माझ्यासाठी महत्त्वाचे असते. मी माझ्या डायरीत छोट्यातल्या छोट्या गोष्टी लिहून ठेवते.’ असे गुपीतही तिने सांगितले आहे.दरम्यान रश्मिकाने नुकतीच झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यालाही हजेरी लावली होती. या अवॉर्ड सोहळ्यात रश्मिकाने लावणीवर ठेका धरला. रश्मिकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रश्मीकाने २०१६ साली ‘किरिक पार्टी’ चित्रपटातून साऊथमध्ये पदार्पण केले. त्याचबरोबर रश्मिकाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुड बाय’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’मध्ये झळकणार आहे. रश्मिका सध्या रणबीर कपूरसह ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय अल्लू अर्जूनसह ‘पुष्पा 2’ मध्ये ती दिसणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!