हडपसर क्षेत्रीय कार्यालयाची रोल मॉडेल कडे वाटचाल
टेरेसवर साकारण्यात आले गार्डन, पुनर्वापरची संकल्पना, १५० झाडांची लागवड, अनोखा प्रयोग
पुणे दि १५(प्रतिनिधी)- हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर नव्याने टेरेस गार्डन उभारण्यात आले. सदर टेरेस गार्डन 3R (Reduce, Recycle, Reuse) च्या धर्तीवर टाकाऊ वस्तू आणि कंपोस्टिंग खताच्या माध्यमातून फुल झाडे, फळ झाडे , देशी झाडे तसेच भाज्या यांची १५० झाडाची लागवड करून बहरले. सौ आशा राऊत, उप आयुक्त पुणे मनपा, श्री प्रसाद काटकर, सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री संजय घनवट आणि कनिष्ठ अभियंता श्री विक्रम लहाने साहेब यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक नवनाथ शेलार, सचिन लडकत, नितीन कांबळे, अभियंता प्रवीण कळमकर, गार्डन विभागाचे श्री करडे साहेब, मुकादम खरात , कीटकनाशक चे निलांबर खरात यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे ब्रँड आंबेसिडर ओम करे यांच्या नियोजनाने सदर टेरेस गार्डन उभारण्यात आले.
टेरेस गार्डन बरोबर हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पंडित नेहरू भाजी मंडई येथे कापडी पिशवी वेंडिंग मशीन चे उदघाटन उपायुक्त सौ आशा राऊत आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी सौ केतकी घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. कापडी पिशवी मशीन ची माहिती भाजी मंडई अधिकारी श्री मंदरूपकर यांनी उपस्थितांना दिली. आशा राऊत यांनी नागरिकांनी टेरेस गार्डन उभारावे तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करून कापडी पिशवीचा वापर करण्याचे आव्हान केले. पालिका अधिक्षक लालडेसाहेब शेख यांनी गार्डन टिकवून ठेवण्याची जबाबदारी घेतली. राऊत मॅडम यांचा सत्कार कापडी पिशवी आणि टेरेस गार्डन मधील मेथी भाजी च्या गड्डी ने करण्यात आला. प्रसाद काटकर यांनी टेरेस गार्डन, कापडी पिशवी मशीन बरोबर, क्षेत्रीय कार्यालय टेरेस वर नव्याने सुरू केलेल्या सोलर उर्जाची माहिती दिली. संपूर्ण हडपसर क्षेत्रीय कार्यालय सोलर ऊर्जेच्या निर्मित विजेवर शून्य बिलावर चालते, अशी समाजउपयोगी आणि पर्यावरण पूरक उपक्रम आम्ही राबवून एक रोल मॉडेल उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे काटकर यांनी सांगितले. अशा प्रकारे सोलर उर्जाप्रकल्प सर्वच क्षेत्रीय कार्यालयांवर उभारावे अशी मागणी ओम करे यांनी आशा राऊत यांच्याकडे केली.
सदर कार्यक्रमाला हडपसर क्षेत्रीय कार्यालय स्टाफ, मंडई अधिकारी,तसेच मोहल्ला कमिटी चे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, शुभ कुंजीर, अशोक सोरगावी, ओम करे, सागर तुपे आणि वसुंधरा ट्री फाउंडेशन चे श्री गोविंदराव पवार यांनी आवर्जून उपस्थिती लावून एक वारकरी एक झाड, झाड आपल्या दारी ऑक्सिजन आपल्या घरी अशा संकल्पनांची माहिती दिली.