नखरेल गर्लफ्रेंडचा नखरा सहन न झाल्याने बाॅयफ्रेंडने केले असे काही…
प्रेमी जोडप्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- पावासाळा सुरु असुन अजूनही मनासारखा पाऊस न पडल्याने महाराष्ट्रातील नागरिक चिंतेत आहेत. पण उत्तर भारतात मात्र जोरदार पाऊस चालू आहे. रस्त्यावर साचलेले पाणी आणि नागरिकांची उडवलेली तारांबळ चर्चेचा विषय असते सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. ते पाहून नागरिक मज्जा घेत आहेत.
पावसाळा प्रेमी जोडप्यांसाठी कायमच आवडाता ऋतू असतो. पण सोशल मिडीयावर व्हायरल होणारा एका प्रेमी जोडप्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नखरे आणि नटणारी मुरडणारी गर्लफ्रेंड आणि तिच्या मागण्या पूर्ण करणारा बाॅयफ्रेंड हे नेहमीचे चित्र असते. पण कधी कधी तिचे हेच नखरे मात्र बाॅयफ्रेंडला वैताग देणारे ठरतात. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात एका तरुणाची दुचाकी फसली आहे आणि ती बंद पडली आहे. त्याची मैत्रीणही त्याच्यासोबतच आहे. ती तरूणी खाली पाणी असल्यामुळे खाली उतरायला तयार नव्हती. आणि पाण्यातून गाडी बाहेर काढले तरुणाला जिकरिचे जात होते. तो तिला खाली उतरण्याची विनंती करूनही ती खाली उतरत नव्हती. अखेर गाडी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी खाली पडली. आणि त्याची मैत्रीणही खाली पडली. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असुन, अनेकजण या व्हिडीओची मजा घेताना दिसत आहे.
Sorry Babu 🤣🤣🤣 pic.twitter.com/zUSjgMzWiQ
— Hasna Zaroori Hai 🇮🇳 (@HasnaZarooriHai) June 30, 2023
पावसाने उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीतर मुसळधार पाऊस सुरू असून यमुना नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते जलमय झाले आहेत. मध्यंतरी भर पावसात प्रेमी जोडप्याने रोडवर रोमँटिक गाण्यावर डान्स केला होता. तो व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.