Latest Marathi News
Ganesh J GIF

हळदीचा कार्यक्रम ठरला शेवटचा! घरी परतताना तरुणाचा अपघाती मृत्यू, पण कुटुंबाने व्यक्त केला घातपाताचा संशय

जळगाव शहरातील कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ मध्यरात्री दुचाकीला झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. अक्षय संजय देशमुख, असे मयत तरुणाचे नाव असून गणेश पवार हे जखमी आहेत.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय संजय देशमुख आणि गणेश पवार हे दोघे मित्र धानोरा येथे एका मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास ते दुचाकीने जळगावकडे परतत होते. कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात अक्षय संजय देशमुख याचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश पवार गंभीर जखमी झाला. गणेशवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नातेवाईकांना घातपाताचा संशय.अपघाताची माहिती मिळताच अक्षयच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. मात्र, मृतदेह आणि दुचाकीची अवस्था पाहून त्यांनी या घटनेवर संशय व्यक्त केला आहे. अक्षयच्या शरीरावर अपघाताच्या तीव्र खुणा नाहीत किंवा जखमाही दिसत नाहीत. अपघात इतका भीषण असेल तर अक्षयला जखमा व्हायला हव्या होत्या, दुचाकीचे नुकसान व्हायला हवे होते. मात्र अक्षयला जखमाही झाल्या नाहीत आणि दुचाकीचे नुकसानही झाले नाही. अक्षयचा भाऊ आणि इतर नातेवाईकांनी हा अपघात नसून कट रचून केलेला घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अक्षयच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्या जळगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.पोलीस आता अपघाताच्या ठिकाणचे पंचनामे, जखमी साथीदाराचा जबाब आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा अपघात होता की घातपात, याचा शोध घेत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!