Just another WordPress site

हर घर तिरंगा मोहीम मुस्लिमांच्या फायद्याची’

कोण म्हणालं अस पहा व्हिडिओ

लखनऊ दि १४ (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका मंदिरातील पीठाधीश्‍वर आणि महामंडलेश्वर यती नरसिंहानंद यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी भाजपच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. हिंदु सगळ्यात जास्त ढोंगी असतात अस सांगताना तिरंगी झेंड्याने हिंदूचे नुकसान केले आहे असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत ते म्हणत आहेत की, “सरकारने पश्चिम बंगालमधील सलाउद्दीन नावाच्या मुस्लिमाच्या मालकीच्या कंपनीला तिरंगा बनवण्याचे कंत्राट दिले आहे. हिंदू हे जगातील सर्वात मोठे ढोंगी आहेत. भाजपावाले लोक सत्तेत आल्यावर त्यांनी मुस्लिमांना सरकारी निविदा दिल्या. तिरंगा खरेदी करण्यासाठी हिंदूंना जो पैसा द्यावा लागेल तो मुस्लिमांच्या खिशात जाईल आणि तो ते जिहादींना दान करतील त्यामुळे मुस्लिम ठेकेदाराला आर्थिक लाभ मिळू नये यासाठी भाजपच्या तिरंगा मोहिमेवर बहिष्कार टाकावा,एखादा जुना झेंडा फडकवावा पण मुळात आपला खर ध्वज भगवा आहे असे नरसिंहानंद म्हणाले आहेत.

GIF Advt

हा व्हिडिओ या महिन्याच्या सुरुवातीला रिलीज झाला होता पण तो गेल्या दोन दिवसांत व्हायरल होत आहे. या व्हिडिओची उत्तर प्रदेश पोलीस तपास करत आहेत. दोषी आढळल्यास यतींवर कारवाई केली जाईल असे पोलीसांनी सांगितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!