रायगड दि १४ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लिंबू फिरवलं आहे असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती नको म्हणत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले होते. पण ठाकरे अजूनही महाविकास आघाडीतच आहेत. त्यामुळे गोगावले यांच्या विधानानंतर नवा वाद होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेच्या आमदारांना दुजाभाव मिळत होता. याची तक्रार आम्ही उद्धव ठाकरेंकडे केली होती. पण त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आम्ही उठाव केला. पण उद्धव ठाकरे यांनी अजूनही महाविकास आघाडी तोडलेली नाही. त्यामुळे पवारांनी ठाकरेंवर लिंबू फिरवलं आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही”अस गोगावले म्हणाले आहेत.शिवसेनेने भाजपासोबत युती केली असती तर आम्ही पाच पावले मागे आलो असतो”, असेही गोगावले म्हणाले आहेत
तत्पूर्वी मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा होती. परंतु, आपण नाराज नसल्याचे म्हणत गोगावले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.