भाजपाचा ‘हा’ वजनदार नेता पुणे लोकसभेची निवडणूक लढवणार?
राष्ट्रवादीच्या गोटात चिंता,तर भाजपातही 'इथे' खळबळ
पुणे दि १९ (प्रतिनिधी)- भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये स्थान मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळात दिल्ली गाठावी लागणार आहे. पण त्यासाठी ते सेफ मतदारसंघ शोधत आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या प्रमाणे ते सुद्धा पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे पुण्यातील भाजप नेत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना तसे पत्र देखील पाठवले आहे.सध्या फडणवीस पुण्याचे पालकमंत्री बननार अशी चर्चा सुरु होती. पालकमंत्री बनून ते लोकसभेची मशागत होण्याची शक्यता आहे. सध्याचे पुण्याचे खासदार गिरिश बापट सध्या आजारी असल्यामुळे ते आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा फडणवीस यांना पुणे लोकसभा लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. पुणे लोकसभेच्या माध्यमातून भाजपा शिरूर, बारामती, मावळ या मतदार संघावर लक्ष देता येणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे भाजप ही संधी साधण्याचा विचार करण्याची शक्यता आहे तस झाल तर भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी काट्याची टक्कर पहायला मिळणार आहे.
फडणवीस यांची चर्चा सुरु झाल्यामुळे भाजपाचे जगदीश मुळिक आणि मुरलीधर मोहोळ यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यांनी तशी तयारीही सुरु केली होती. पण आता फडणवीसांचे नाव अधिकृतपणे समोर आल्याने हे दोन नेत्यांचे दिल्लीचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.पण फडणवीस यांनी पुणे लोकसभेतून निवडणूक लढवल्यास पुण्याचे राजकीय गणित बिघडणार आहे. तसेच राष्ट्रवादीलाही आव्हान मिळणार आहे.