Just another WordPress site

आफताबच्या गाडीवर हिंदू सेनेचा तलवारींनी हल्ला

पोलिसांचा हवेत गोळीबार, श्रद्धा हत्याकांडामुळे हिंदू संघटना आक्रमक

दिल्ली दि २८(प्रतिनिधी)- श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर सोमवारी काही हिंदु संघटनांनी हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोरांनी हातात तलवार घेऊन पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडत आफताब ला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.परंतु पोलीसांनी प्रसंगवधान दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दिल्ली पोलिसांकडून आफताबची पॉलिग्राफ टेस्ट सुरु आहे. यासाठी आफताबला रोहिणी परिसरातील लॅबमध्ये पॉलिग्राफ टेस्टसाठी नेण्यात आले होते. ही टेस्ट झाल्यावर आफताबला पुन्हा तुरुंगाच्या दिशेने नेले जात होते. पोलिसांच्या गाडीतून त्याला तुरुंगाकडे नेले जात असताना त्याठिकाणी अचानक हिंदू सेनेचे कार्यकर्ते आले. त्यांच्या हातात तलवारी होत्या. या तलवारींच्या साहाय्याने हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आफताबच्या गाडीवर हल्ला केला. तलवारींच्या साहाय्याने पोलिसांच्या गाडीवर अनेक घाव घालण्यात आले. मात्र, यामध्ये आफताबला कोणताही दुखापत झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यावेळी पोलिसांनी हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीचा दरवाजा उघडून आत शिरण्याचाही प्रयत्न केला. मात्र, लोखंडी गजांमुळे हल्लेखोरांना आफताबपर्यंत पोहोचता आले नाही. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून एका पोलीस अधिकाऱ्याने रिव्हॉल्वर काढून हवेत गोळीबार केला. दिल्ली पोलिसांनी वेगाने कारवाई करत हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत.

GIF Advt

या घटनेचे आता राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांची कडक सुरक्षा असतानाही हिंदू सेनेला आफताब पुनावालाच्या गाडीचा नेमका ठावठिकाणा कसा कळाला, इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते तलवारी घेऊन गाडीपर्यंत कसे पोहोचले, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान चाैकशीत आफताब सहकार्य करत नसल्याची चर्चा आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!