Latest Marathi News
Ganesh J GIF

हिंजवडी आयटी पार्क हादरलं! नामांकित कंपनीतील धक्कादायक प्रकार

पिंपरी : पुणे शहरात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मारामाऱ्या, हत्या आणि लूटमार या घटना घडत असताना आता महिला अत्याचाराचे प्रमाणही वाढले आहे. अशीच एक घटना हिंजवडी आयटी पार्कमध्ये  घडली आहे. यामध्ये हिंजवडीमधील एका नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या हेल्पर महिलेवर तिच्या असाह्यतेचा फायदा घेत तिथल्या सुपरवायझरने तिच्यावर बलात्कार केला आहे.

काय घडले नेमके?

हिंजवडी फेज २ मध्ये २६  मे रोजी ही अत्याचाराची घडली होती. पीडित महिलेने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात १३ जून रोजी तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली. सूर्यकांत गणपती रामनल्ली (वय ३४  , रा. हिंजवडी) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडित महिला ही कंपनीत हेल्पर म्हणून काम करते, तर आरोपी हा कंपनीत सुपरवायझर आहे. या आरोपी सुपरवायझरने २६  मे रोजी पीडितेवर जबरदस्ती करत बलात्कार केला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. यानंतर देखील आरोपीने त्रास देणे सुरू ठेवल्याने अखेर कंटाळून पीडित महिलेने बुधवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!