उपमुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांच्या पत्नीच्या गाण्याचे व्हिडिओ जास्त पाहिले जातात
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यावर जोरदार पलटवार, मंत्र्यांच्या पत्नी पुन्हा चर्चेत, राजकीय वक्तव्याची जोरदार चर्चा
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारण सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच मी पुन्हा येईन या व्हिडीओमु़ळे महाराष्ट्राचे जास्तच चर्चेत आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्यावर एका काँग्रेस नेत्याने जोरदार टिका केली आहे. केंद्रातील भाजपाच्या मदाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचा ‘अडवाणी’ केल्याची टीका काँग्रेस आमदार कन्हैया कुमार यांनी केली आहे. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांना देखील या वादात ओढले आहे.
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कन्हैया कुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला आहे. ते म्हणाले, आजकाल देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नीचे म्हणजे अमृता फडणवीस यांच्या गाण्याचे व्हिडीओ जास्त बघितले जातात. मला फडणवीसांची दया येते, देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन,’असं म्हणत होते. पण केंद्रातल्या त्यांच्या मदाऱ्यांनी त्यांचा पार ‘अडवाणी’ केला आहे. १०५ आमदार असूनही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवून स्वत: त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करावं लागत आहे. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये कोणतं डिटर्जंट वापरतात की पक्षात येण्याआधी भ्रष्ट असलेला नेता भाजपामध्ये येताच अचानक पवित्र होतो, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावेळी कन्हैया कुमार यांनी अमित शहांवर देखील टिका केली आहे. काँग्रेसमध्ये आल्यापासून भाजपचं आमच्यावरचं प्रेम खूप वाढलं आहे. पण ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नची फिरकी खेळण्याची सवय झाली होती, त्याचप्रमाणे मलाही जय शाह यांच्या वडिलांची गुगली खेळता येते, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्याचसोबत ड्रग्जचे अतिप्रचंड साठे अदाणी यांच्या ताब्यात असलेल्या मुंद्रा बंदरातच कसे मिळतात, यावर केंद्रीय गृहमंत्रालय काहीच बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आज देशात सगळ्याच क्षेत्रांमध्ये एककेंद्री व्यवस्था झाली आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळत नाहीत. स्पर्धेसाठी समान संधी तयार केली, तरच नवे उद्योजक आणि उद्योग उभे राहतील. त्यातूनच रोजगारनिर्मिती होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्या आपल्या राजकीय वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. आता तर त्या त्यांच्या गाण्यामुळे काँग्रेस पक्षात देखील लोकप्रिय झाल्या आहेत. दरम्यान अमृता फडणवीस यांनी यावर अजून कोणतेही भाष्य केलेले नाही.