Latest Marathi News
Ganesh J GIF

बाॅलीवूडमधील हाॅट अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात?

इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेला उधान, बघा कोणासोबत करणार लग्न

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील सर्वात हाॅट समजली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या रिलेशनमुळे कायम चर्चेत असते. ती चित्रपटांपासून दूर असली तरी तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती, ज्यावरून ती लवकरच अर्जुनबरोबर विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

मलायका आणि अर्जुनच्या नात्याची बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चा होत असते. दोघांच्या वयामध्ये तब्बल १२ वर्षांचं अंतर आहे. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुनबरोबर रिलेशनशीपमध्ये आली होती. मलायकाला एक मुलगा देखील आहे.पण ती बी टाउनमध्ये तिच्या हाॅटनेसाठी ओळखली जाते. नुकतीच मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मलायका लाजताना दिसत होती. फोटो शेअर करत तिने म्हटलं की, “मी होकार दिला.” तिच्या या पोस्टनंतर तिने अर्जुन कपूरलाच होकार दिला असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे ही जोडी कधी विवाहबंधनात अडकणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मलायका आणि अर्जुन यांनी कधीही आपले नाते लपवले नाही तसेच अनेकवेळा ते एकत्र दिसून आले आहेत. अर्जुन व मलायका लवकरच लग्न करणार आहेत या चर्चेमुळे चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

मलायका लवकरच ‘मुव्हिंग विथ मलायका. या रिलॅलीटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो ५ डिसेंबर पासून ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर पाहता येणार आहे. या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून मलायकाची कधीही न दिसून आलेली बाजू प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. हा शो तिच्या जीवनावर आधारित असणार आहे. या शोच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्यातली अनेक गुपिते समोर येणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!