
दिरासोबत शारिरिक संबंध ठेवायला सांगत पतीचे असे कृत्य
हडपसर पोलीसात गुन्हा दाखल, पोलिसांची मोठी कारवाई
पुणे दि ११(प्रतिनिधी)- सासरी छळ होत असतानाच पतीने आपल्या पत्नीला दिराबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांगितले.पण त्याला नकार दिल्याने विवाहितेला मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यास आलेल्या तिच्या आईचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमधून समोर आला आहे. याप्रकणी हडपसर येथील एका ३३ वर्षाच्या महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी फिर्यादी महिलेचा पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात घडला. शिंदे वस्तीतील एका सोसायटीत ७ मे २०१७ ते १० नोव्हेंबर २०२२ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा
विवाह झाल्यानंतर सासरकडील लोकांनी तिला घरातील काम येत नाही म्हणत शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. पण नंतर पतीने दिराबरोबर शारीरिक संबंध ठेव, असे सांगितले, पण महिलेने नकार दिल्यानंतर आणि हा प्रकार माहेरच्या लोकांना सांगितला तेव्हा त्याचा जाब विचारण्यासाठी विवाहितेची आई वडील घरी आले होते. त्यावेळी त्यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करत विनयभंग केला. वडीलांनाही चाकूचा वार करत जखमी केले.
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेंना पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फिर्यादी महिलेचा पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डांगे करत आहेत.